*मुलांच्या शिक्षणामुळे साजरी होतेय नंदीबैलवाल्यांची आनंदी दिवाळी !* (प्रशांत वाघमारे .)
पालावरच जीन आता संपून जाय रं,
शिक्षणाच्या दिव्यामुळे आमी बी पुढं जाय रं !
वर्षेभर नंदीबैलासह गावोगावी भटकणार्या नंदीबैलवाल्यांची दिवाळी त्यांच्या पालावरच मोठ्या उत्साने साजरी होत आहे. कारण त्याच्या पासून लांब असणारी त्यांची मुल आज त्यांच्या सोबत होती.
धोतर,नेहरु शर्ट त्यावर कोट व डोकीला लाल फेटा बांधलेल्या नंदीबैलवाल्या सोबत जीन, टि शर्ट , पंजाबी ड्रेस घातलेली त्यांची मुल-मुली मोठ्या आनंदाने पाहून , शहरी वातावरणात जनरेशन गँपमुळे संवाद दुरावलेल्या दोन पिढ्यांची किव आली.
बीड जिल्ह्यातील कडा-आष्टी गावच्या नंदीबैलवाल्यांची पाल वाखरी परिसरात विसावली होती. लहान मुलांची दिवाळी साजरी करण्याच्या उत्साहाबरोबरच मोठ्या माणसांच्या नंदीबैलासह दिवाळी मागण्यास जाण्याची गडबड चालू होती.
कुतूहलापोटी त्यांच्या पालावर जाण झाल अनं पारंपारिकते बरोबरच शिक्षणामुळे जाणवणार आधुनिकपण नजरेस पडल. सखाराम पवार(बाबा)यांच्या मार्गदर्शनाखाली ही सर्व मंडळी गावोगावी भटकत असतात. गुजराती जातीची नंदीबैलाची खोंड विकत घेतात.पोटच्या पोराप्रमाणे त्यांचा सांभाळ करुन ,त्यांना प्रशिक्षित करतात. नंदीबैलाचा खेळ करुन लोकांकडून धान्य,थोडेफार पैसे मिळतात. त्यावरच सार्या संसारीची गुजरान त्यांना करावी लागते. नंदीबैलास एका गावावरुन दुसर्या गावी नेण्यासाठी वाहनांचाही वापर करावा लागतो. पूर्वी सारखे लोक दान देत नाहीत. गावाकडे आसलेल्या मुलांना पैसे पाठवावे लागतात, फार ओढाताण होत आसल्याचे खिन्न मनाने महिला सांगत होत्या. परंपरागत आलेला हा व्यवसाय ,अखेरपर्यंत चालू ठेवणार आसल्याचे सर्व वडीलधारी मंडळी सांगत होती.
त्याच वेळेस शाळेला सुट्टी असल्याने पालावर आई-वडीलांकडे आलेली मुले मात्र खूप शिकणार असल्याची सांगत होती. त्यातील बहुतेक मुले गावाकडेच राहतात.काही बरोबर आजी असेल तर ठिक नाहीतर बहिणभाऊ घरीच राहून, स्वतःच स्वयंपाक करुन जिद्दीने शिक्षण पूर्ण करीत आहेत.हाँस्टेलला व्यवस्था बरोबर नसल्याचे ते सांगतात.
सचिन ढवळे व त्याची बहिण प्रियांका दोघेच घरी राहून शिक्षण पूर्ण करीत आहेत. सचिन बारावीत असून प्रियांका नववीत आहे. सचिन पाडव्यालाच परत जाणार आहे कारण तो असोशिएशन कडून कबड्डीच्या स्पर्धेत सहभागी होणार आहे. आई-वडील अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत राहत असून , खूप शिक्षण घेऊन त्यांना सुखी
करण्याचा मनोदय ती दोघा बोलून दाखावित होती. तर जवळच असणारी त्यांची आई डोळ्यात आनंदाश्रू घेऊन कौतुकाने मुलांकडे पाहत होती.
कितीही कष्ट पडत असले तरी तरी , सर्व मुलांना शाळेत घातले असल्याचे अभिमानाने सांगणारे नंदीबैलवाले पाहून आता पालावरही ज्ञानाची दिवाळी मोठ्या धुमधडाक्याने साजरी होत असल्याचे जाणवले !
फटकण फुटणार्या फटाक्यांवर लाखो रुपये खर्च करणार्यांनी आजूबाजूच्या उपेक्षितांसाठी मदतीचा हात पुढे करुन सहकार्याची, मदतीची खरी दिवाळी साजरी केल्यास या सणांचा आनंद द्विगुणीत होईलच ,पण त्या बरोबरच पैशात मोजता न येणार आत्मिक सुखही मिळेल ! मग चला करुयात आपल्याही दिवाळीत असेच कुणाला तरी सामिल !!

No comments:
Post a Comment